मंगळवार, जुलै ०५, २०११

प्रेम म्हणजे नक्की काय असत ?





















प्रेम म्हणजे नक्की काय असत ?
एकमेकांबद्दल वाटणार शारीरिक आकर्षण ?
की शारीरिक आकर्षणाबरोबरच वाटणार मानसिक आकर्षणही ?
की त्याही पलिकडे तीसर काहीतरी !
आजवर अगणिक प्रतिभावंतांनी हे कोड उलगडायचा आपापल्या परिन प्रयत्न केला आहे.
पण तरीही हे गूढ़ कुणालाच उकललेल नाही.
निरनिराल्या वयात प्रेमाची वेगवेगळी रूप आकारात येतात.
त्या त्या वयात ती तितकीच खरी अन् उत्कट असतात.
मात्र, उमलत्या वयातल प्रेम हे अजब गारुडच आहे.
त्यातली कोवळीकता...
त्यातल अनावर झेपावण...
त्यातली नवथर हुरहुर...
जणू सगळ आभाळ कवेत आलेल असत त्यावेळी !
हळूहळू वय वाढत जात. स्वप्न आणि वास्तवाची गाठ पड़ते.
धूसर स्वप्नगाण विरत जात. तरीही ते बेधुंद क्षण आपला पाठलाग सोडत नाही.
भूतकाळ भविष्याच्या मानगुटीवर बसतो.
आणि मग ..... वर्तमान सैरभैर होतो....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा