शुक्रवार, जुलै २९, २०११

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

कदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे 
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे
 
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
 
तुझे ते टपोरे घारे डोळे
 
व गुलाबासारखे गाल
 
तुझे ते ओठ नशिले
 
आणि मस्तानी चाल
 
फ़क्त माझ्याच या नजरेणे तुलाच बघायचे आहे
 
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
 
तुझे ते रेशमी केस
 
हलकेच हवेत उडत
 
तुला झुल्यात बसवण्यासाठी
 
मन माझे तडपडत
 
त्या स्वप्नाच्या झुल्यात
मला पण झुलायचे आहे
 
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
 
तु जवळून माझ्या जाताना
 
येत असे सुगंधी वारा
 
मनात माझ्या बरसे
 जणू
पावसाच्या धारा
 
त्या सुगंधी पावसात
तुझ्याच बरोबर भिजायच आहे
 
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
 
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच
 आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा