जीवनाच्या प्रत्येक वाटेवर हवीहवीशी वाटणारी
प्रत्येक क्षणाला साक्ष ठरणारी
तुझी आश्वासक साथ मला हवी आहे. ||1||
माझ्या यशात सहभागी होणारी
त्याचा मनापासून आनंद लुटणारी
तुझी निर्मळ साथ मला हवी आहे. ||2||
माझे दु:ख वाटून घेणारी
ते हलके करण्याचा प्रयत्न करणारी
तुझी कोमल साथ मला हवी आहे. ||3||
सन्कटसमयी मला आधार देणारी
त्याचा सामना करण्याचे बळ देणारी
तुझी खंबीर साथ मला हवी आहे. ||4||
चुकल्यास माझी कानऊघडणी करणारी
नेहमीच योग्य मार्ग दाखवणारी
तुझी मार्गदर्शक साथ मला हवी आहे. ||5||
आयुष्यभर मला सोबत देणारी
इतरांसाठी आदर्श ठरणारी
तुझी साथ निरंतर मला हवी आहे. ||6||
प्रत्येक क्षणाला साक्ष ठरणारी
तुझी आश्वासक साथ मला हवी आहे. ||1||
माझ्या यशात सहभागी होणारी
त्याचा मनापासून आनंद लुटणारी
तुझी निर्मळ साथ मला हवी आहे. ||2||
माझे दु:ख वाटून घेणारी
ते हलके करण्याचा प्रयत्न करणारी
तुझी कोमल साथ मला हवी आहे. ||3||
सन्कटसमयी मला आधार देणारी
त्याचा सामना करण्याचे बळ देणारी
तुझी खंबीर साथ मला हवी आहे. ||4||
चुकल्यास माझी कानऊघडणी करणारी
नेहमीच योग्य मार्ग दाखवणारी
तुझी मार्गदर्शक साथ मला हवी आहे. ||5||
आयुष्यभर मला सोबत देणारी
इतरांसाठी आदर्श ठरणारी
तुझी साथ निरंतर मला हवी आहे. ||6||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा