सोमवार, जून २७, २०११

तुझी सोबत...

हातातुन सरकत जाणार्‍या
वाळुच्या कणासारखी
एकेक वर्ष निसटुन जातात...!
खेळाचं राज्य प्रत्येकावर येतं ...
या डावात आपण शोधत बसतो
एखादी वळीवसर आठवण
वाळुचे खोपे...
पुस्तकातली सुकलेली फुले
मोरपीशी सांज,
गंधमाखली रातराणी
आणि तुझी सोबत....
ए, आपण वाळुचा खोपा पुन्हा बांधायचा?
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा