मंगळवार, जून १४, २०११

डोळ्यांची ती अबोल भाषा.......

तेच झाड , तीच सावली , तीच चांदण्यांची रंगावली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
प्रेम नावाच्या वादळात मी उध्वस्त व्हायचं ठरवलं
पण त्या वादळानेच माझं घर सावरलं,
दैनंदिनी प्रेमाची मी हृदयातच लिहिली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
नाकारता ना आले मजला काट्यांतूनहि चालता येते
पहाडाएवढ दु:खसुद्धा हसता हसता पेलता येत,
त्या प्रेमदेवतेच्या अर्चनेस मी जीवनज्योतच अर्पिली,  डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
तुझे बोलके डोळे मलाच अबोल करत होते
मी बोलण्याआधीच ते बरच काही सांगून जात होते ,
त्या धारदार नजरेत पाहिली मी रेशमी प्रीतीची लाली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
मिळाला तुझा आसरा म्हणूनच जीवन जगता आलं
दु:खाच्या सावलीतही सुखात रमता आलं ,
तुझ्या कुशीतच निर्धास्त विसावलो मी चांदराती रंगमहाली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
मनामनातून गुंफले होते स्वप्नांचेच धागे
एक पवित्र नाते जुळले होते शब्दांच्याच मागे ,
प्रेमसागरतीरी मी एक स्वप्नील दुनियाच साकारली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा