तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला
चारआणे खर्च नको म्हणून नुसता चालत राहिला
स्वताच्या पोटाला चिमटा घेत ह्याचे त्याचे करीत गेलां
मध्यम वर्गातला असा शिक्का स्वताच मारून घेतला
शेव-पुरी पाणी पुरी घरीच करून खायचे
काटकसर करून करून आयुष्य जगायचे
लग्न झाले बायको पण अशीच गरीब घरची
हनिमूनला न जाता घरीच गात बसली
डोहाळे डोहाळे लागले फक्त कुरमुरे खाण्याचे
स्वप्न त्याना कधी पडायचे एकादशीचे
खरे म्हणजे बर्यापैकी पगार होता त्याचा
पगार झाला म्हणजे घरी पेढे आणायचा
देवापुढे ठेऊन घरी प्रसाद वाटायचा
कधीतरी चार आण्याचा गजरा आणायचा
नवरा मात्र उदार असे वाटून ती सुखावून जायची
चालण्यासारखा व्यायाम नाही, असे दोघे म्हणायची
भर उन्हात सुद्धा दोघे चालत घरी यायचे
थंड थंड माठ्तले पाणी पिऊन दोघे तृप्त व्हायचे
काळ गेला वेळ गेली , कळले देखील नाही
वय झाले कसे गेले कळले सुद्धा नाही
एके दिशी छातीत कळ नि अचानक तो गेला
घरासाठी मात्र खूप ठेऊन काही गेला
तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला
चारआणे खर्च नको म्हणून नुसता चालत राहिला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा