मंगळवार, जून १४, २०११

मनात जपता आले तर...........

रविवारी गावी गेलो होतो. माझ्या चुंलत पुतणीच लग्न होतं. ती दिलीय कोणाला तर माझ्या आत्याच्या नातवाला. त्यामुळे लग्न दोन्ही कडूनही जवळच. लग्न गावाकडे. मला दोघेही खूप मानतात. त्या दोघांचं जेवणाचं ताट मीच केलं दोघांना एकेक घास भरवला. नंतर एक लाडू घेतला. आधी नवरदेवाला त्यातला एक घास घ्यायला लावला. नंतर त्याच उष्टावलेल्या बाजूचा एक घास नवरीला घ्यायला लावला. आणि मग तो लाडू नवरदेवाच्या हाती देत म्हणालो, ” आता हा उरलेला लाडू खायचा नाही बरा का ? तो असाच जपून ठेवायचा. “
” पण सांभाळायचा कोणी त्यांनी का मी ?” नवरी म्हणाली.


” दोघांनीही !!!! आपापल्या मनात.
गोड आठवणींचे असे अनेक लाडू प्रत्येकाला आपल्या मनात जपता आले तर आयुष्य किती गोड होईल नाही !

विशाल सिनकर.......



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा