बुधवार, मे २५, २०११

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का ? Valentine Day Propose Special

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?

माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या
जीवन मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छापूर्ती
तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

I LOVE YOU SO MUCH SWEETHEART .........!! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा