बुधवार, मे २५, २०११

आयुष्य एक रंगभूमी...

आयुष्याच्या ह्या रंगभूमीवरचे,
आपण जणू एक कलाकारच असतो
आपापल्या परीने प्रत्येक जण,
आपापली भूमिका ति बजावत असतो

प्रत्येक दिवस तो नवा प्रयोग ह्या,
रंगमंचावर मांडत असतो
असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे,
आपण येथे साकारत असतो

कुणास जमतो-कुणास जमतो,
अभिनय येथे परी करावाच लागतो
दुःखात हसून डोळे हळूच पुसून,
नाट्यमय देखावा उभारावाच लागतो

कितीही लांबला जरी खेळ हा तरी तो,
शेवट त्याचा अपुल्या हातीच नसतो
खेळावेच लागते म्हणुनी खेळत राहणे,
ह्या परी कोणता मग मार्गच नसतो

ह्या खेळाचा सूत्रधार तो,
एकमेव हा देवच असतो
आपण फक्त जणू ताबेदार ते,
हुकमावर त्याच्या नाचत असतो

तोच ठरवितो आपुली भूमिका,
अन क्रमा-क्रमाने बदलत नेतो
शेवटी देउनी वृद्धपणा तो,
आपुली रजाही मानुनी घेतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा