बुधवार, मे २५, २०११

गुलाबी थंडी.................


गुलाबी थंडी हवीहवीशी,
जुळती  नाती  नवी-नवीशी.

'गारवा' गाणे कुडकुडत गुणगुणणे,
फुटल्या ओठांचे हलकेच हसणे.

हात चोळणे खांदे उंचावून,
स्वेटर घालणे थंडी लागून.

एकच कप चहा दोघांनी पिणे,
खूप थंडी आहे....पुन्हा पुन्हा सांगणे.

पतंग उडवण्यासाठी  धडपडने,
पतंगासोबतची  उंचच स्वप्ने.

कधी रुसणे ......कधी रागवणे,
बोलण्यासाठी पुन्हा कारण शोधणे.

गोड बोलूया ... एकमेकांना सांगायचे
तिळगुळ वाटत - घेत फिरायचे,

या वर्षीच्या गारव्यात  एकदा 
देईन  वचन अन करेन वादा.,

स्वप्नासाठी तुझ्या प्रार्थना  करीन 
हवे तुला ते सारे मागेन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा