शनिवार, मे २८, २०११

प्रेम" यालाच का म्हणावे?


प्रेम कधी मागून मिळत नाही
ते आतून जाणवावं लागतं,
नजरेतून कळलं तरी
शब्दांतून सांगावं लागतं...
रोज तुझी आठवण येते आणि
रोज डोळ्यांत पाणी उभं राह्तं,
तू जवळ हवीस असं वाटताना
खूप दूर आहेस,हे सांगून जातं...
कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात...
माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा
म्हणून मी शब्दांची वाट धरली,
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस
या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली?
का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे?
अनोळखी,तरीही परिचित असावे,
यालाच का "प्रेम" म्हणावे?
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघिनाही सांगता येत नाही,
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांत येत नाहीत... 

बाल कवी ( विशू ).

मनात जपता आले तर

रविवारी गावी गेलो होतो. माझ्या चुंलत पुतणीच लग्न होतं. ती दिलीय कोणाला तर माझ्या आत्याच्या नातवाला. त्यामुळे लग्न दोन्ही कडूनही जवळच. लग्न गावाकडे. मला दोघेही खूप मानतात. त्या दोघांचं जेवणाचं ताट मीच केलं दोघांना एकेक घास भरवला. नंतर एक लाडू घेतला. आधी नवरदेवाला त्यातला एक घास घ्यायला लावला. नंतर त्याच उष्टावलेल्या बाजूचा एक घास नवरीला घ्यायला लावला. आणि मग तो लाडू नवरदेवाच्या हाती देत म्हणालो, ” आता हा उरलेला लाडू खायचा नाही बरा का ? तो असाच जपून ठेवायचा.

” पण सांभाळायचा कोणी त्यांनी का मी ?” नवरी म्हणाली.

” दोघांनीही !!!! आपापल्या मनात.
गोड आठवणींचे असे अनेक लाडू प्रत्येकाला आपल्या मनात जपता आले तर आयुष्य किती गोड होईल नाही !
विशाल सिनकर........

माझा एकांत आणि मी.

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,

कधी मनात जपलेल्या वाटांशी..
पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो..

शुक्रवार, मे २७, २०११

तुझ्या जाण्याने........


तुझ्या जाण्याने,
जरी डोळे पाणावलेले असले
तरी ते तुलाच पाहत आहेत
तुझ्या जाण्याने,
ओठांवर असले जरी रडू
तरी ते हाक् तुला मारत आहे
तुझ्या जाण्याने
मनात व्याकुळता पसरली
तरी ते आठवण तुझीच काढत आहे
तुझ्या जाण्याने
हातातला हात सुटला तरी
तो साथ तुझीच मागतो आहे
तुझ्या जाण्याने
तुझी सोबत उठलेले पाऊल
तुझ्या पावलाच्या खुनान वरच पडत आहेत
तुझ्या जाण्याने
निराशा झाली तरी
तू परत येणार हि आशा आहे
अर्धवट सोडून गेलेले स्वप्न
नव्याने माझ्या करिता सजवणार आहे
माझा तू माझ्या साठी परत
येणार आहेस ............................

कसं विसरू मी तुला


श्वास आहेस तू माझा,
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा.
सांग ना कसं विसरू मी तुला.

माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.

एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

तुझ्या तो कोमल हाताचा स्पर्श,
मनात रुजून आहे कित्येक वर्ष.
कसा जाणार सहवास तुझा सांग मला,
सांग ना कसं विसरू मी तुला. 

साभार - कवी : विशाल सिनकर 

सुखामागे धावता धावता .......


एक मैत्रिण आहे माझी...



एक मैत्रिण आहे माझी...
माझ्या सोबत हसणारी
मी रडल्यावर मात्र...... माझे डोळे पुसणारी


एक मैत्रिण आहे माझी...
नेहमी सलवार-कमीज़ घालणारी
साधेपणातच सौंदर्य आहे.... हे सिद्ध करणारी,


एक मैत्रिण आहे माझी...
हिशोबिपणे वागणारी,
तिच्या या सवयीमुळे.....माझे पैसे वाचवणारी,


एक मैत्रिण आहे माझी...
कठोरतेने वागणारी,
जरा ओरडलो की मात्र..... मुसू मुसू रडणारी,


एक मैत्रिण आहे माझी...
माझ्यावर सारखी चिडणारी,
कळत मात्र.... माझ आयुष्य फुलवणारी,


एक मैत्रिण आहे माझी...
सर्वाना हवीहवीशी वाटणारी,
माझ्याशिवाय मात्र.... स्वतःला अपूर्ण मानणारी

ब्रह्मकमळ - एक निसर्ग चमत्कार


खरतर कमळ हे पाण्या मध्ये येत पण त्याला अपवाद आहे तो ब्रह्म कमळाचा. त्याला कमळ नाही तर फुल म्हटलं पाहिजे. पण त्याचा आकारच खूप मोठा असतो. हे कमळ जमिनीत लागत. आणि तिथेच त्याची वाढ होऊन साधारण चार पाच वर्षात त्याला कमळ यायला लागतात. आणखी एक विशेष म्हणजे ते कमळ फक्त बरोबर रात्री १२ वाजता पूर्ण फुलत. ते म्हणे अनेक वर्षांतून एकदा..फक्त रात्रीच उमलतं ..ही फुले मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात. फुलांचा पांढरा रंग मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. त्याचा वास, त्याचं दिसणं मन धुंद करणारं, वेडावणारं..ते पहाणारासुध्दा भाग्यवान, ज्याच्या बागेत ते डोलतं..तो तर सुखी :)
या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून केली जाते. पांढऱ्या रंगाची, सुमारे ते १२ इंच लांबीची ही फुले जुलै महिन्याच्या अखेरीस ऑगस्ट महिन्यात लागतात. कळी मोठी होताच सायंकाळी उमलण्याची प्रक्रिया सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत फूल पूर्ण उमलले जाते. 'निशोन्मीलित' अशा या ब्रह्मकमळाची शोभा अवर्णनीय आहे. दले, पाकळ्या, पुंकेसर स्त्रीकेसर . विविध भागांची या ब्रह्मकमळातील रचना कुतूहल निर्माण करणारी आहे. म्हणूनच आकर्षक देहयष्टी नसतानाही या वनस्पतीने मानवी जीवनात विशेष स्थान मिळविले आहे. या बाबतीत त्याचा सुगंधही बऱ्याच अंशी कारणीभूत आहे.

गुरुवार, मे २६, २०११

प्रेम तुझं खरं असेल तर....

ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या 
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….




प्रेम तुझं खरं असेल तर 
जीव तुझ्यावर ओवाळेल ती 
स्वत:च्याचं भावनांचं मन 
शेवटी ती मारेल तरी कीती.. 

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर 
तीही त्यात वाहून जाईल 
मनावर अमृत सरी झेलत 
तीही त्यात न्हाहून जाईल.. 

विचार तुझा नेक असेल, तर 
तीही तुझा विचार करेल 
हृदयाच्या तिच्या छेडून तारा 
सप्तसूरांचा झंकार उरेल.. 

आधार तुझा बलवान असेल, तर 
तीही तूझ्या कवेत वाहील 
मग, कितीही वादळं आलीत 
तरी प्रित तुमची तेवत राहील.. 

आशा सोडण्या इतकं 
जिवन निराशवादी नाही रे 
तिला जिंकता यावं इतकं 
मानवी हृदय पौलादी नाही रे.. 

पण, मित्रा जर ती नाहीचं आली 
तरीही तू हार मानू नकोस 
तू तर प्रामाणिकपणे खेळलास 
आयुष्याला जुगार मानू नकोस.. 

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं 
थांबत नाही ते कोणासाठी 
घे भरारी पुन्हा गगनी 
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.