रविवार, एप्रिल १७, २०११

कविता.........


नियतीचा हा खेळ निराळा
खेळात लागलो चिरडू ग
कळत नाही माझे मलाच
हे काय लागल घडू ग ?

पेचात पडायचो मी सगळ्यांना
लागले प्रश्न मज पडू ग
कळत नाही माझे मलाच
हे काय लागल घडू ग ?

तूच होतीस आवड माझी
लागल कोण आवडू ग
कळत नाही माझे मलाच
हे काय लागल घडू ग ?


तूच होतीस राणी स्वप्नांची
तुझ्या विनाच स्वप्ने सारी
मला लागली पडू ग
कळत नाही माझे मलाच
हे काय लागल घडू ग ?

बोललो नाही कधी तुझ्याशी
तर जेवण जात नव्हत ग
बोललो नाही जरी तुझ्याशी
तरी लागलो हादडू ग
कळत नाही माझे मलाच
हे काय लागल घडू ग ?

पाहिलं नाही कधी तुला
तर चैन मला न पडे ग
दूर निघालीस तू माझ्या पासून
तरी येईना रडू ग
कळत नाही माझे मलाच
हे काय लागल घडू ग ?

करत असशील खारे प्रेम तर
माफ कर तू मला
विसरून जा तू सगळ काही
नको माझ्यावर चिडू ग
कळत नाही माझे मलाच
हे काय लागल घडू ग ?

मैत्री.........


काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री

जीवनात खूप करण्याजोगं असतं......



प्रेम नसते ना?????????




एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी..
ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली...होती......... 
खूप खुश होती ती ...... 
आज तिला तिच्या प्रीयाकराकडून अंगठी मिळणार होती.....
ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती
तेव्हड्यात तिचा प्रियकर आला ...
त्याला बघून तिला खूप आनंद झाला ......
त्याने तिला Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून
teddy bear
दिला ........... 
teddy bear बघून ती नाराज झाली , कारण तिला
अंगठी पाहिजे होती ..... !!!!!
ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला .......... 
रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला
गेला तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...
आणि तो जागीच मरण पावला.
हे पाहून तिच्या डोळ्यातून मुसळधार पाउस पडू लागला ....
आक्रोश करून ती रडू लागली ......
आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली ....
तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि,"

प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे, Will you plz maary me?



गुरुवार, एप्रिल १४, २०११

शब्द आणि भावना............


पूर्वी शब्दांपेक्षा भावनेला खूप खूप महत्व असायचे ,
कारण तेव्हा माणस भावना प्रधान होते,
पण आता शब्दांना अतिमहत्व प्राप्त झाले आहे
कारण आता माणस भावना शून्य होत चालले आहेत...
त्यामुळेच आता
...खूप वेळा खोटेच रडावं लागत
खूप वेळा खोटेच हसावं लागत
अनेक ठिकाणी खोटेच लिहाव लागत
बऱ्याच वेळी खोटेच बोलाव लागत

आणि ह्यामुळेच
हया संघर्षमय जीवनात सुखाने जगायचं असेल
तर मन दगडाचे असाव लागत ...

प्रेम कधी असतं, तेच कळत नाही.. प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही


प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..!!

फ़ार बरं झालं असतं,
जर मनालाचं, बोलता आलं असतं,
अगर ओठांनी शब्दांना,
कधीच अडवलं नसतं,
मग मन माझं,
मोकळं होऊन बोललं असतं,
अन सुत तुझं-माझं,
एकदाचं जुळलं असतं !!

पण, प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..!!

सगळेचं सांगतात मला,
एकदा डोळ्यांत बघ तिच्या,
म्हणे डोळ्यांत प्रेम दिसतं,
पण यांना कुणी सांगाव,
तु समोर आल्यावर,
डोळ्यांत तुझ्या पाहण्याचं,
धॆर्यच माझ्या...डोळ्यांत नसतं !!

डोळ्यांत पाहिलही असतं मी,
पण काय सांगाव ..
डोळ्यांत, प्रेम नसलचं तर
अन असुनही,
जर मला ते नाही दिसलं तरं ?

कारण, प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..!!!! 

तु मला आवडतेस....


तु मला आवडतेस
ही कविता असेल असे मलाही वाटत नाही, आणी याला कोणी कविता म्हणावी अशी
माझी इच्छाही नाही. हे नुसतेच जुळलेले शब्द आहेत, भावना दर्शवण्यासाठी
एकत्र जमलेले. तुम्हास शब्दांपलीकडचे वाचता आले तर तुमची जीत, पण आवडली
नाही तर माझी हार.


तु मला आवडतेस.


नाही !
मी प्रेम करत नाही तुझ्यावर !
पण होय तु मला आवडतेस.
याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो.
मला कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं चालणं.
कोणाचे डोळे आवडतात, तर कोणाचं हसणं.
याचा अर्थ असा नाही कि मी त्या सा-यांवर प्रेम करतो.
कारण, आवड नी प्रेम यात फरक आहे.
आवड मर्यादीत.
म्हणुनच त्याला विशेषणांची गरज आहे.
उगाच का म्हणतो आपण,
थोडं आवडतं जास्त आवडतं.
कधी म्हणताना ऎकलंय ?
माझं थोडंसच प्रेम होतं !

पण प्रेम ? प्रेम म्हणजे?
आयुष्यभर एखाद्याची सोबत करावीशी वाटणं,
आयुष्याच्या टोकापर्यंत त्याच्या सोबत चालणं !
मग वाट कशीही असो,
काट्याकुट्यांची वा मखमलीची, त्यात अंतर नाही.
आणी तुझ्या सोबत आयुष्य वाटुन घ्यावं
असंतर मला कधीच वाटलं नाही.
म्हणुनच म्हणलोना, मी तुझ्यावर प्रेम करत नही.

पण, तु मला आवडतेस.
तु मला आवडतेस, तुझ्या दिसण्यामुळं !
नव्हे.. तर तुझ्या असण्यामुळं.
होय, तुझ्या असण्यामुळं.
नुसतं असण्यामुळं म्हणण्यापेक्षा.
सोबत असण्यामुळं.
हे जास्त बरोबर आहे.
बस्स ! अशीच सोबत रहा.
कारण
तु मला आवडतेस :)

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना


माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,

तू आहेस माझी स्वप्न परी,
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वार्यावरी,

येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी,

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!