त्या आपल्या भेटीनंतर
डोळा लागलाच नाही रात्री
तुलाही झोप आली नसेल
ह्याची मला आहे खात्री
.
.
.
माझ तुझ्यावरील प्रेम
तुला कधी ग कळणार
अजून किती रात्री
मला अश्या छळणार.
.
.
वर बघ ग जरा
ते लुकलुकणारे तारे
आपल्याच प्रेमाचे गीत
गात आहेत ते सारे
.
.
.
निळ्या आकाशाचा पदर डोक्यावर घेऊन
ही रात्र नववधूसारखी लाजत आहे शांत
चंद्र-तारे मंद स्मित करत आहेत मध्येच चमकून
मला मात्र आहे तुझ्या मिलनाची भ्रांत
.
.
प्रकाशाच्या भेटीसाठी
काळी रात्र जोरात सरत आहे
मिलन अशक्य हे जाणूनही
वेडा प्रयत्न करत आहे
.
.
.
तू अगदी शांत झोप
ही रात्र आपोआप सरेलच
काळाच्या ह्या ओघात
तुझी जखम हळूहळू भरेलच
.
.
.
अमावास्येच्या ह्या काळ्या रात्री
चंद्र कुठेतरी हरवला आहे
चांदण्यांनी मात्र आपला
दरबार चांगलाच भरवला आहे.
.
.
तुझ्या इच्छेसाठी
तुटलाय ग तो तारा
तुझ्या सोयीसाठी
सुटलाय ग हा वारा
तुझ्या आनंदासाठी
चांदण्याचा हा पिसारा
तुझ्या झोपेसाठी
चंद्र जागतो आहे बिचारा
तुझ्याचसाठी
खेळ मांडला हा सारा
फक्त तुझ्यासाठी …
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा