गुरुवार, मार्च ३१, २०११

हर हर महादेव.............चक दे, चक दे इंडिया ............चक दे ,चक दे इंडि..या...

काल पाकिस्तान टीम

आपल्याला सेमी फायनल मध्ये भिडली ..

आपल्या टीम इंडियाने

पाकड्यांना धूळ चारली ...

धुमधडाक्यात सेहवागने सुरवात केली..

उमर गूल ची त्याने चांगलीच खरडपट्टी काढली ..

सचिन रैना ने आपली फलंदाजी सावरली ..

आणि पाकड्यान समोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली ..

मोक्याच्या क्षणी भजी, मुनाफ, नेहरा, युवराज आणि झहीर ची गोलंदाची  बहरली ..

एक एक करून सगळ्या पाकिस्तानच्या फलंदाजांची दांडी गुल केली ..क्षेत्र रक्षणची सुधा आपल्याला चांगली साथ लाभली..

पाकिस्तान  बरोबर विश्व चषकामध्ये कधीच नाही हरली ..

पाकड्यांना नेहमीप्रमाणे घरची वाट दाखवली ..

अन भारताने आपली शान राखली..

अन विश्व चषकाची फायनल गाठली ..

आता विश्व चषक जिंकण्याची उत्कंठा वाढली ..

आता विश्व चषक भारताचाच याची खात्री सुद्धा मनाला पटली...

कारण एक एक करून सगळ्याच दिग्गज संघांना भारताने धूळ चारली ..

भेटीचे प्रेमांतर !!!!

छान एका बागेत भेटण्याचे ठरले.

मी उशीरा आल्याने तिने दुरूनच पाहता

नाक मुरडले.

जीन्स,टी-शर्ट नेहमी घालणारी ती

आज चक्क सलवार घालून आली होती

बघून तिला मनात माझ्या प्रेमाची बासरी वाजत होती   

अरे वा! तुमचे वाहन आज वेळेवर आले

तू कुठे गेला होतास?रागातच तिचे विचारणे 

आल्या आल्या प्रश्न काय विचारते तूर्तास 

कुठे काय? तुलाच आलो भेटण्यास

चल बसुया आत

भलताच दिसतोय वेगात



तिने मुद्दाम तिची ओढणी माझ्या

डोळ्यावर भिरकावत विचारले......

तुला दिसत नाही आज काही वेगळेपण?

हो जरा जास्तच रमणीय आहे वातावरण

असा कसा रे तू अनरोमांटिक

अगं बाजूच्या बाकावर बसलेली मुलगी आहे फंटास्टिक

रागाने उठून गेली ती तरातरा

मीही तिच्या मागे गेलो भराभरा

हातात घेउनी तिचा हात

म्हणालो खूप सुंदर दिसतेय तू आज

कसला चढलाय तुझ्या रुपाला साज

बदललेला दिसतोय तुझा मिजाझ......



आवडते मला तुझे रागावणे 

काहीतरी नवीन सांग हे तर रोजचेच रडगाणे

नवं काही करायला गेलं तर तुझे नेहमीचेच बहाणे

देशील का मला माझे हवे ते मागणे


काय हवं आहे तुम्हाला मि.शहाणे 
गायचेय आज तुझ्या हृदयातील गाणे

हवा आहे तुझा मखमली स्पर्श

वातावरणात बहरू दे अपुल्या भेटीचा हर्ष

लाजलाजूनी चूर होऊन ती दूर पळाली

तिच्या लाजण्याने मला नवी चाहूल मिळाली   

चटकन तिच्या गालावर लाजेची खळी खुलली

रुसलेली माझी सखी प्रीतीच्या गुलाबाने पुन्हा फुलली.....

बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून ...........

प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी
ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ....................

जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे
मनाला जाणवलं तेव्हा हे हसणार मन
दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत
कदाचित दोघानाही सांगायचे होते काही
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

जे जमले नाही मला या जन्मी
कदाचित मिळविण मी तुला पुढच्या
जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या
जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला
खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................